शुक्रवार, ४ जून, २०१०

का वाटवी मातृभाषेत शिकण्याची लाज?


सध्या जिकडे-तिकडे निकालांची चर्चा सुरू आहे.थोड्याच दिवसांत आपल्या पाल्यांच्या अॅडमिशनसाठी पालकांची धावपळ सुरू होईल.मग अनेक सल्ले येतील.आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायला पाहिजे हा नवीन अट्टहास सध्या जिकडे तिकडॆ सर्रास बघावयास मिळतो.अगदी रोजंदारीच्या कामावर जाणारा देखील म्हणतो की नाही मुलाला इंग्लिश मिडियममध्येच टाकायचे.
याचे परिणाम हळूह्ळू दिसायला सुरवात झाली आहे.महानगरपालिका-झेड.पी.च्या शाळा ओस पडतायत, तर दुसरीकडे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळॆत बेमाप डोनेशन्स भरून केजीच्या प्रवेशासाठी दिवस-रात्र रांगेत उभे राहण्यासाठी लोक तयार आहेत.नुकतेच मुंबईत इंग्रजी माध्यम्याच्या शाळांची संख्या मराठी माध्यमांच्या शाळांच्या संख्येपेक्षा अधिक झाली.ज्या मुंबईत मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी १०५ जण हुतात्मे झालेत,तेथे मराठीची ही दयनीय अवस्था बघून या १०५ आत्म्यांना कदाचित आपले बलिदान व्यर्थ गेल्यासारखे वाटत असेल.
खरंतरं मातॄभाषेतून घेतलेले शिक्षण हे सर्वोत्तम शिक्षण मानले जाते.आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.कलाम,अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर,महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे या असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींनी देखील आपले प्राथमिक शिक्षण आपल्या मातॄभाषेतूनच घेतलेले आहे.शिवाय त्यांचे आजचे इंग्रजीवरील प्रभुत्त्व देखील आपण सर्व बघतच आहोत.परंतु आजकाल नवनवीन समजूतींमुळे लोक नको त्या गोष्टीकडे जास्त आकर्षिले जातात.असेच जर चालू राहिले तर उद्या कदाचित व्यवस्थित मराठी येणारा वर्ग या शिवाजी महाराजांच्या आपल्या १० कोटी जनतेच्या महाराष्ट्रात शोधावा लागेल.जगात प्रत्येक ठिकाणी आपल्या मातॄभाषेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले जातात.आपल्याकडेही असे प्रयत्न होतायेत,गरज आहे प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची!

3 comments:

Shirish Jambhorkar म्हणाले...

Ekdam barobar aahe ...

Maithili म्हणाले...

Agdi yogya mat mandale aahet...aani Marathi madhyamatun shikun kahich nuksaan hot nahi...jhalech tar phayada hoto ki nidan tyanche ekatari bhashewar prabhutva aste...!!!
Mala majhya aai babnchya mala Marathi tun shikvanyachya nirnyaacha abhimaan vatato...!!!

PATIL म्हणाले...

खुप छान माहिती आहे. आमच्या ब्लॉग नक्की भेट द्या.
JIo Marathi

टिप्पणी पोस्ट करा