बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१०

खरचं आजची शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?

सध्या जोतो आपल्या शिक्षणपद्धतीबद्दल वाटेल तसे बोलू लागला आहे ,हे बघून माझ्या मनात प्रश्न येतो की, खरच आपली शिक्षणपद्धती इतकी वाईट आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता माझ्या वाचनात आले ते बिल गेट्स यानी आपल्या २००३ मधील भारत दौरयावर असताना या विषयी वक्त केलेले मत ज्यात ते म्हणतात की, ”Word’s best education system is Indian education system!” एकीकडे आपण आपल्या स्वत:च्या शिक्षणव्यवस्थेच्या नावाने खडे फ़ोडत असताना दुसरीकडे हे जगातील सर्वश्रीमत व्यक्तीचे मत ! याचा आपण विचार करायला हवा.
शेवटी नाण्याला दोन बाजू असतात कोणत्या बाजूने बघायचं हे आपल्यावर असत. आपली शिक्षणव्यवस्था इतकीही कामतून गेलेली नाही,पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत,हे मलाही मान्य आहे. त्यात काळानुरूप बदल होणे अपरिहार्य आहे.

1 comments:

महेश म्हणाले...

सध्याची शिक्षण पद्धती जरीएकदमच वाईट नसेल तरी तितकीशी समाधानकारक सुद्धा नाहीये. आजच्या शिक्षण पद्धतीत कालानुरूप बदल अपेक्षित आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर द्यायला हवा.

टिप्पणी पोस्ट करा